QuizKatta गोपनीयता धोरण
अद्ययावत: 25 सप्टेंबर 2026
कोणता डेटा घेतो?
नोंदणीदरम्यान नाव, मोबाईल, तुम्ही दिल्यास ईमेल आणि जिल्हा/तालुका आणि लक्ष्य परीक्षा घेतो. पासवर्डचा hash ठेवतो. Quiz प्रयत्न, उत्तरे, गुण, प्रमाणपत्र व login वेळ नोंदवतो. साइटचा दिवसनिहाय अंदाजे visit count ठेवतो; या count साठी IP साठवत नाही.
वापर
खाते चालवणे, निकाल/Leaderboard/प्रमाणपत्र दाखवणे आणि सुरक्षेसाठी login history वापरतो. तुम्ही संमती दिल्यास नव्या Quiz चे ईमेल पाठवतो; Dashboard मधून ही निवड बदलता येते. ईमेल verification बंद असेल तर दिलेला ईमेल तुमचाच आहे याची पुष्टी झालेली नसते.
दृश्यमानता व सुरक्षा
Leaderboard वरील नाव आणि गुण इतरांना दिसू शकतात. तुमच्या quiz प्रयत्नांचा तपशील व प्रमाणपत्र पाहण्यासाठी तुमचा login आवश्यक आहे. सत्रासाठी आवश्यक cookie वापरतो. विद्यार्थी परवानगी दिल्यास डिव्हाइसचा Push endpoint सुरक्षितपणे जतन करून नवीन टेस्ट आणि सूचना पाठवतो; परवानगी ब्राउझर सेटिंगमध्ये बंद करता येते. वेबसाइट HTTPS वर वापरा.
डेटा हटवणे
Account Delete पानावरून विद्यार्थी स्वतःचे खाते आणि त्याच्याशी जोडलेले quiz attempts, login history, email delivery नोंदी, Push subscriptions व verification token कायमचे हटवू शकतो. त्यामुळे certificate व leaderboard नोंदही हटते. Server backups मधील प्रती backup प्रक्रियेनुसार काही काळ राहू शकतात; अचूक कालावधी hosting setup नुसार ठरवावा लागेल.